मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षणासंदर्भात आज शिंदे समितीचा आढावा घेणार असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची शिंदे समितीच्या सदस्याबरोबर बैठकही होणार असल्याची माहिती आहे.
एकीकडे जरांगे पाटील यांच्याकडून आंदोलनाची तयारी केली जात असताना दुसरीकडे सरकारकडून हालचालींना वेग आला आहे. शिंदे समितीसोबत मुख्यमंत्री यांची सह्याद्री किंवा वर्षा बंगल्यावर ही महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे.नुकतीच मागासवर्गीय आयोगाची पुण्यात बैठक पार पडली होती.त्यानंतर आज मुंबईत ही महत्वाची बैठक पार पडत असल्याने मराठा आरक्षणाबाबत सरकार एखादा मोठा निर्णय घेणार का? याकडे सुंपर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
येत्या २० जानेवारीपर्यंत आरक्षणावर निर्णय घ्या, अन्यथा आझाद मैदानावर आमरण उपोषण करू, असा इशारा मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.