पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येच्या दौऱ्यावर असून त्यांनी अयोध्या धाम रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले आहे. यावेळी राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. तसेच योगी सरकारमधील अनेक केंद्रीय मंत्री आणि मंत्रीही उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज अयोध्येत जंगी स्वागत करण्यात आले असून मोदी अयोध्या विमानतळावर उतरताच हजारो लोकांनी एकाच वेळी प्रचंड जल्लोष केला. त्यानंतर मोदींचा रोड शो अयोध्या विमानतळ ते अयोध्या रेल्वे स्थानकापर्यंत पार पडला. हजारो लोकं या रोड शोमध्ये सामील झाले होते. मोदींवर फुलांची उधळण होत होती. मोदी मोदी असा जयघोष आसमंतात घुमत होता. जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमुन गेला होता.
त्यानंतर मोदी यांनी अयोध्येसाठी 16 हजार कोटींच्या प्रकल्पांची घोषणा केली. तसेच मोदी यांच्या हस्ते चार पुनर्विकसित रस्त्यांचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर पंतप्रधानांनी अयोध्या धाम जंक्शन येथून अमृत भारत आणि वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.तसेच अयोध्येतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्धाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले असून विमानचे टर्मिनल 500 चौरस मिटर परिसरात पसरलेले आहे. दरवर्षी 10 दहा लाख प्रवाशांना सेवा देण्यासाठी हे विमानतळ सुसज्ज असणार आहे.