मोरोपंत उर्फ मोरेश्वर नीळकंठ पिंगळे यांचा जन्म. ३० डिसेंबर १९१९ जबलपूर येथे झाला. ते भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक वरिष्ठ नेते होते. “हिन्दु जागरणाचा सरसेनानी” म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला होता. संघ प्रचारक म्हणून झालेल्या त्यांच्या ६५ वर्षांच्या सेवेत, त्यांनी विविध पदे भूषविली. त्यातील, ‘अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख’ हे पद सर्वोच्च होते.
सन १९७५ मध्ये भारतात लागू केलेल्या आणीबाणीच्या काळात ते सहा सरसंघचालकांपैकी एक होते. भारतीय प्रसारमाध्यमांनी, रामजन्मभूमी आंदोलनादरम्यान त्यांचा “फील्ड मार्शल” म्हणून गौरव केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक प्रकल्प सुरु करण्यात आले: गौ-संशोधन, सरस्वती नदी शोध, इतिहास पुनर्लेखन ही त्यातील काही उदाहरणे. त्यामुळे त्यांना संघाचा प्रकल्प पुरुष ही पदवी मिळाली. ते प्रसिद्धिपराङ्मुख होते. त्यांचे वर्णन ‘सर्वच ठिकाणी पण कशातच नाही’ असे करता येऊ शकेल. ते आपले जीवन संघाचा खरा स्वयंसेवक म्हणून जगले.
१९८३ मध्ये झालेल्या एकात्मता यात्रेपाठोपाठच, राम-जानकी रथयात्रा काढण्यात आली.ही राम जन्मभूमी आंदोलनाची पूर्वतयारी होती.या यात्रेचा उद्देश, हिंदूंना संघटित करणे तसेच त्यांच्यामध्ये अभिमानाची भावना जागृत करणे, हा होता. बिहार व उत्तर प्रदेश या प्रांतांमधून सात रथ प्रवास करत करत अयोध्येला पोचले. या रथांमध्ये भगवान श्रीराम हे अयोध्येत तुरुंगात आहेत असे दाखविण्यात आले होत.
मोरोपंतांना या यात्रेचे संयोजक व नियंत्रक म्हणून नेमण्यात आले होते. सन १९८६ मध्ये, फैजाबाद न्यायालयाने हिंदू समाजाची जागरूकता जाणून घेऊन अयोध्येतील राममंदिराचे कुलूप काढण्याचा आदेश दिला. मोरेश्वर नीळकंठ पिंगळे यांचे निधन २१ सप्टेंबर २००३ रोजी झाले
सौजन्य – विश्व संवाद केंद्र,पुणे