डॉ. नितीन करीर यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली आहे. विद्यमान मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्याकडून करीर यांनी आज पदभार स्वीकारला. सौनिक आज सेवानिवृत्त झाले. नितीन करीर हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या १९८८च्या तुकडीतील अधिकारी आहेत. दरम्यान राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ हे देखील आजच निवृत्त झाले असून त्यांच्या जागी आता विवेक फणसळकर हे कार्यभार पाहणार आहेत. फणसळकर हे सध्या मुंबई पोलिस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.