अयोध्येत राममंदिर झाले. भव्य-दिव्य, सुंदर, दणकट झाले. युगप्रवर्तक असे मंदिर उभे राहिले. हिंदू समाजाने स्वयंप्रेरणेने अर्वाचीन काळात केलेला सर्वात मोठा पराक्रम त्यामागे आहे. संपूर्ण विश्वाचे लक्ष लागलेले होते, अशी ही निर्मिती झाली आहे. ज्यावेळी अपमानाचे प्रतिक असलेला ढाचा पडला त्यावेळी पृथ्वीवर पश्चिमेला पराभवाची, जेत्यांच्या विजयाची खूण असलेली प्रसिद्ध बर्लिन भिंतही कोसळत होती. हा योगायोग एवढ्यासाठी आठवायचा की बर्लिन भिंतीप्रमाणे अपमानाचा ढाचा पडण्याची घटनासुध्दा विश्वाच्या चर्चेची होती. कारण इस्लामी आक्रांताशी कसे दोन हात करायचे या प्रश्नाचे सभ्य जगाला पडलेले कोडे अयोध्यास्थित हे रामललाचे मंदिर सोडवणार होते. म्हणूनच ही वैश्विक जबाबदारी उचलण्याचे आवाहन हेच राममंदिर हिंदू समाजाला व भारताला करत आहे.
राममंदिर समाजाकडून भविष्यात काय अपेक्षा करीत आहे हे आपण पहात आहोत. अब्राहामिक परंपरेतील सर्वात विकृतपणे, असहिष्णूपणे विजातीय समाजांकडे पाहणाऱ्या इस्लामला सभ्य जगाने कशाप्रकारे विरोध करावा, कशाप्रकारे संघर्ष करावा, कशाप्रकारे इस्लामला ताडन करावे हे जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीने, समाजाने व देशाने म्हणजे हिंदू समाज व भारताने शिकवावे ही अपेक्षा हे राममंदिर करत आहे.
ही ऐतिहासिक जबाबदारी हिंदू समाजावर येऊन पडली आहे कारण हिंदू समाजाने राम मंदिरासाठी केलेला अभ्यासपूर्ण संघर्ष! अयोध्या आंदोलन हे इस्लामी आक्रांतांविरूध्दचे जगातील एकमेव असे यशस्वी आंदोलन आहे जे सरकार, सैन्य, तलवार यांच्या शिवाय देखील यशस्वी झाले. या पूर्वी इस्लामचा पराभव युरोपात झाला पण तो तलवारीच्या जोरावर झाला. इथे मात्र संपूर्ण समाजाने इस्लामचे विकृत आक्रमण अभ्यासून इस्लाम, सरकार, बेताल विचारवंत या सर्वांविरुध्द एकाचवेळी एल्गार केला व नि:शस्त्रपणे परंतू लढाऊवृत्तीने दीर्घकाळ संघर्ष करून त्याचा पराभव करून दाखवला. अयोध्येत उभे राहिलेले राममंदिर भविष्यात हा मार्ग सर्व जगाला दाखवण्याची प्रेरणा आपल्याला देत आहे.
कुराण, हदीस, शरिया यातील नागरी सभ्यतेच्या विरुद्ध कोणतेही कलम सभ्य जग सहन करणार नाही व त्यामुळे वरील तीनही स्रोत अपरिवर्तनीय असणार नाहीत हे आपल्याला सिद्ध करायचे आहे. जबरदस्तीने देवालय, जरी कोणी मूर्तिपूजक नसेल तरीही, त्याला पाडता येणार नाही. बहुसंख्य रहाण्यासाठी ३७० कलमाचा आधार घेता येणार नाही, तोंडी तलाक देऊन कोणाही महिलेच्या भावना अपमानित करता येणार नाहीत, देश-मातृभूमी हे आम्हाला मान्य नाही हा उद्धटपणा खपवून घेतला जाणार नाही,
जिझिया कररूपी अपमान चालणार नाही, विद्येची मंदिरे कुराणापेक्षा वेगळी म्हणून जाळून टाकता येणार नाहीत; हे आणि असे बरेच काही करून भविष्यात ही विकृती कशी रोखायची याचे जगाला मार्गदर्शन भारत व हिंदुंनी करावे ही अपेक्षा हे राममंदिर व्यक्त करते.
अयोध्येतील रामजन्मभूमीवरच्या राममंदिराने ‘जगाच्या कल्याणा’ आमच्यासाठी दिलेला संकेत हाच आहे.
#राममंदिर #राष्ट्रमंदिर
– सुनील देशपांडे
९४२०४९५१३२
सौजन्य -विश्व संवाद केंद्र