अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे उद्घाटन आज पिंपरी चिंचवड येथे होणार आहे. यापूर्वी आज शहरातून नाट्य दिंडी काढण्यात आली. ज्यामध्ये अनेक कलाकारांनी हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले.
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या आज पिंपरी चिंचवडमधल्या शोभा यात्रेला सुरुवात झालेली आहे. यंदा 100 वे वर्ष असल्याने भव्य नाट्य दिंडी काढण्यात आली असून अनेक कलाकार यात सहभागी झाले आहेत. संजय मोने, वैभव मांगले, पुष्कर श्रोत्री, अनिकेत विश्वासराव,तेजश्री प्रधान अशा अनेक कलाकारांनी आवर्जून उपस्थिती लावली आहे. तसेच रंगमंचावर मोठे योगदान असलेले अनेक कलाकार यामध्ये सहभागी झालेले बघायला मिळाले.
यावेळी अनेक पारंपरिक आणि विविध कलांचे सादरीकरण करण्यात आले आजच्या नाट्य संमेलनाच्या उदघाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, तर शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत हे उपस्थित आहेत. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या उदघाटन समारंभाला दांडी मारल्याचे दिसून आले.