आज सकाळी साडे आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्यावर ईडीने धाड टाकली आहे. रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू नेत्यांपैकी एक म्हणून ओळखले जातात. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी वायकर यांच्यावर ईडीने धाड टाकली आहे. याप्रकरणी सप्टेंबर महिन्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच त्यांची चौकशी देखील करण्यात आली होती. या या ईडीने टाकलेल्या धाडीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंद एयानी प्रतिक्रिया दिली आहे.
रवींद्र वायकर यांच्यावरील ईडी कारवाईबाबत माध्यमांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारले असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ”ईडी महाराष्ट्र सरकारच्या हातात आहे का? कर नाही त्याला डर कशाला. आम्ही कोणत्याही प्रकारच्या सूडभावनेने, राजकीय आकस ठेवून कोणतेही काम आमचे सरकार करणार नाही. नाहींतर तुम्हाला माहिती आहे कोविड मध्ये काय भ्रष्टाचार केलेला आहे, किती पैसे खाल्लेले आहेत.डेडबॉडी बॅगमध्ये पैसे खाल्ले. खिचडी ३०० ग्रॅमची १०० ग्रॅम केली. ऑक्सिजन प्लांटमध्ये पैसे खाल्ले. हे सगळे रेकॉर्डवर आहे. मग आम्ही त्यांना कफन चोर का खिचडी चोर म्हणायचे ? त्यामुळे पुराव्याशिवाय कोणी आरोप करू नयेत.”
रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरे गटाचे आमदार आहेत. ठाकरेंच्या अत्यंत विश्वासू नेत्यांमधील एक अशी त्यांची ओळख आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीचे १० ते १२ अधिकाऱ्यांचे पथक सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास वायकर यांच्या घरी दाखल झाले आहे. जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी वायकर यांच्या विरोधात सप्टेंबर महिन्यात ईडीने गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्यांची चौकशी देखील करण्यात आली होती. ईडीने रवींद्र वायकर आणि त्यांच्या भागीदारांवर धाड टाकली आहे. मुंबई पालिकेच्या जागेवर ५०० कोटींच्या ५ सतार हॉटेलचे बांधकाम केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तसेच मातोश्री स्पोर्ट्स ट्रस्टच्या आणि सुप्रीमो बँक्वेटच्या नावाने शेकडो कोटींच्या घोटाळ्याचा, पालिकेच्या अख्यतारीत असलेले क्रीडांगण आणि गार्डनच्या जागेवर बांधकाम केल्याचा, जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवरील व्यारवली गावात बांधकाम असे आरोप वायकर यांच्यावर आहेत.