विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल देणार आहेत. साडेचार वाजल्यापासून जवळपास एक तास अध्यक्ष या निकालाचे वाचन करणार आहेत . या निकालाचे ठळक मुद्दे यावेळी सांगितले जातील. त्यानंतर निकालाची प्रत दोन्ही गटांना दिली जाणार आहे. आजच्या निकालाने शिवसेनेचे कोणते आमदार अपात्र ठरणार आणि कोण नाही याचा महाफैसला होणार आहे.
दीड वर्षांपूर्वी म्हणजे 21 जून 2022 रोजी एकनाथ शिंदे यांनी वेगळा मार्ग स्वीकारत आणि आपल्या समर्थक आमदारांना घेऊन ते सुरतमार्गे गुवाहाटीला पोहोचले. त्यानंतर त्यांना येऊन मिळणाऱ्या आमदारांच्या संख्येत वाढ होत गेली. नंतर शिंदेंनी भाजपच्या साथीने राज्यात सत्ता स्थापन केली आणि ते मुख्यमंत्री झाले. शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद हा निवडणूक आयोगात गेला.निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजूने निकाल देत पक्षावर त्यांचा दावा योग्य ठरवला होता. आणि शिवसेना हे पक्षाचे नाव आणि चिन्ह अधिकृतपणे शिंदे गटाला बहाल करण्यात आले.
पण त्याचवेळी हा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. पक्षांतर बंदीच्या कायद्याखाली ह्या बाहेर पडलेल्या शिंदेसह 16 बंडखोर आमदारांना अपात्र करा अशा आशयाची याचिका उद्धव ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आली. त्याचवेळी आपलीच सेना ही खरी शिवसेना असल्याचा दावा करत एकनाथ शिंदे गटानेही उद्धव ठाकरेंच्या 14 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली. आता त्याचबाबतीत थोड्याच वेळात फैसला होणार आहे.
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा आज महाफैसला पहा LIVE https://www.youtube.com/watch?v=_V6-aiirzts