विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे विधिमंडळाच्या सेंट्रल हॉल मधून आमदार अपात्रता या प्रकरणावर निकालाचे वाचन करत आहेत. यावेळी निकालाचे वाचन करत असताना राहुल नार्वेकरांनी एक महत्वाचे वक्तव्य केले आहे. शिवसेनेची १९९९ ची घटना ही वैध असून, २०१८ साली ठाकरेंनी केलेली घटनादुरुस्ती मान्य नसल्याचे नार्वेकर म्हणाले आहेत. त्यामुळे हा ठाकरेंची पहिला धक्का समजला जात आहे.
निवडणूक आयोगाकडे सोपविण्यात आलेल्या १९९९ च्या घटनेचा आधार घ्यावा लागणार आहे, असे सांगत २०१८ ची घटना स्वीकारता येणार नसल्याचे राहुल नार्वेकर म्हणाले आहेत. नार्वेकर म्हणाले, ”२०१८ मधील घटना ग्राह्य धारावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. मात्र २०१८ च्या घटनेची नोंद निवडणूक आयोगाकडे नाही. निवडणूक आयोगाकडे असलेली नोंद ही १९९९ च्या घटनेची आहे. तीच घटना ग्राह्य धरली जाईल. यामुळे ठाकरे गटाची मागणी अमान्य करण्यात आली आहे.”