शिवसेना आमदार संतोष बांगर हे अनेक कारणांमुळे वादात सापडल्याचे पाहायला मिळाले आहे. पण आता ते कोणत्या कारणामुळे नाही तर त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. मोदी पुन्हा पंतप्रधान झाले नाही तर मी भर चौकात फाशी घेईन, असे चॅलेंज शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी दिले आहे. त्यांनी दिलेल्या या चॅलेंजमुळे ते सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत.
2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आहेत. तसेच मोदी पंतप्रधान झाले नाही तर मी स्वत: भर चौकात फाशी घेणार असल्याचे चॅलेंज संतोष बांगर यांनी केले आहे. त्यामुळे आता बांगर यांच्या या नव्या चॅलेंजची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे.
विशेष म्हणजे संतोष बांगर यांचे हे पहिलेच चॅलेंज नसून याआधीही त्यांनी मिशी कापण्याचे एक चॅलेंज केले होते. जर कळमनुरी बाजार समितीमध्ये सत्ता आली नाही तर मिशी कापून घेणार असल्याचे चॅलेंज संतोष बांगर यांनी दिले होते. मात्र, निवडणुकीनंतर कळमनुरीमध्ये महाविकास आघाडीने 12 जागेवर दणदणीत विजय मिळवला होता. पण या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बांगर यांनी हे मोठे चॅलेंज दिले होते. ‘या पॅनेलच्या 17 पैकी 17 जागा निवडून आल्या नाही तर मिशी कापेन, असे बांगर म्हणाले होते.
दरम्यान, मिशी कापण्याच्या चॅलेंजनंतर संतोष बांगर यांनी आता आणखी एक चॅलेंज दिल्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत.