जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
अग्निरेखा म्हणजे वीज. काळ्याकुट्ट आभाळात कडकडाट करत,स्वयंप्रकाशित होणारी वीज म्हणजे अग्निरेखा !
तत्कालीन समाजाची सामाजिक व राजकीयदृष्ट्या जी अंधकारमय परिस्थिती होती,त्या पार्श्वभूमीवरजिजाबाईंचे कार्य हे अग्निरेखे प्रमाणेच आहे.
यवनांनी देवगिरीच्या यादवांचे विजयनगरचे साम्राज्य उद्ध्वस्त केले ते अनिती, स्वैराचार,दुर्वर्तनाच्या व सत्तेच्या बळावर! या देशाचा इतिहास परंपरा आणि संस्कृती अनन्वित अत्याचार होऊनही, मग अत्याचार करणारे यवन असोत किंवा इंग्रज, पण ती आजही सुरक्षित आहे. याला कारण एकच, या देशातील मातीत जन्मलेली अनेक नरनारी रत्ने! त्यापैकीच एक नारी रत्न-अग्निरेखा म्हणजेच जिजाबाई!
शहाजीराजे फक्त तीन वर्षाचे जिजाबाई फक्त एक वर्षाच्याअसताना मालोजीराजे भोसले व लखुजी जाधव यांच्या सहजच चाललेल्यागप्पांमधून या दोन बालकांचा विवाह ठरला. भोसले घराणे जाधवांच्या घराण्याइतके वरचढ नाही म्हणून जिजाबाईंच्या आईंना हा विवाह मान्य नव्हता. लखुजी जाधव पातशहाच्या दरबारी पंच हजारी सरदार होते. पण असा मान मालोजी भोसले यांकडेनव्हता. पत्नीच्या नकारामुळे लखुजींनी या विवाहास नकार देताच मालोजींनीपातशहाकडे लखुजी जाधव विरुद्ध तक्रार केली. मालोजी भोसले व लखुजी जाधव यांचेदरबारातील स्थान पातशहाला माहित होते. या दोघांमध्ये वितुष्ट आले, तर त्याचा फटका पातशाही ला बसणार. हे ओळखून निजामशहाने मालोजीराव यांनाही पंच हजारी बहाल केली. अशाप्रकारे भोसले-जाधव बराबरी का खानदान बनल्यावरच जिजाबाई व शहाजीराजे यांचा विवाह झाला..
जाणत्या झाल्यावर मराठा बलवान असून त्यांच्यात एकजुटीचा अभाव आहे. त्यामुळे परक्यांची चाकरी आपणही करू नका आपल्या मुलांनाही करायला लावूनका, यासाठी जिजाबाईंनी शहाजी राजांची अनेक वेळा मनधरणी केली. स्वकीय सर्व एकत्र आले तर पातशाही उलथून टाकण्यास वेळ लागणार नाही, हे त्यांनी पदोपदी सांगितले..पणशहाजी राजांना त्यावेळी पातशाहासाठी मुलूखगिरी करून वतनदारी मिळवण्यातच आनंद वाटत होता.
एकदा या संदर्भात खुद्द स्वतःच्या वडिलांनाही जिजाऊनी विचारले होते. त्यावेळी लखुजींनी त्यांना स्पष्ट सांगितले सांगितले, की पातशहा कडून मिळणाऱ्या मान-मरातब,शिलेदारीला, स्वसुखाला आम्ही कुणासाठी तरी लाथ मारणार नाही. हा अविचार आमच्या कडून होणार नाही. वास्तविक पाहता जाणत्या वयात सामान्य जनतेचे चाललेले हाल पाहून जनतेला कोणीतरी वाली हवा, यासाठी जिजाऊ प्रयत्न करत होत्या. आपल्या वडिलांनी सामान्य जनतेसाठी वापरलेला कोणासाठी तरी हा शब्द जिजाऊंना त्या वेळी रुचला नव्हता.
सुलतानशाही रिती रिवाजात शहाजीराजांनाऐशोआरामाची लागलेली सवय जिजाऊंना रुचत नव्हती. शहाजीराजांनी स्वतःच्या बळावर भव्यदिव्य करावे असे त्यांना वाटे. जिजाऊंच्या म्हणण्यासाठी शहाजीराजांनी पेमगिरी राज्य व मराठ्यांना जमवण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. त्याबद्दल जिजाबाई खंत व्यक्त करतात. जिजाबाईंच्या मते शहाजी राजांच्या या प्रयत्नात जोर जोश नव्हता. प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न कधीच यशस्वी होत नाहीत. त्यांनी अगदी मनापासून प्रयत्न केले असते तर शिवबाने जे केले ते शहाजीराजांच्याच हातून झाले असते. यावरून पतीच्याशौर्याबद्दलविश्वासही त्या व्यक्त करतात.
एकदा त्या आपल्या आईला म्हणतात, देवाने मला स्त्री जन्म देऊन चूक केली. जर मी पुरुष असते तर यवनांच्या दुर्वर्तनाला नक्कीच विरोध केला असता. त्यावर त्यांच्या आई म्हणाल्या की, हे भोसले यांनी मनावर घेतले पाहिजे. स्वतःच्या पतीला पूर्णपणे ओळखलेल्या जिजाबाई आपल्या आईला म्हणाल्या पातशाही चाकरीत राहून पातशाहीला विरोध करता येत नाही, मुक्तपणे वागता येत नाही. पेमगिरीचा प्रयत्नानंतर आता अपेक्षा करणे गैर आहे. आता माझीसारीभिस्तशिवबा वर आहे.
बंगलोरहुन पुण्याला येताना संभाजीराजांना शहाजीराजांनी स्वतःकडे ठेवले. परंतु शिवबाला आम्ही आमच्या सुखासाठी आमच्याकडे ठेवणार अशी स्पष्ट कल्पना पतीला देताना या अग्निरेखेला स्वतःच्या सौभाग्याची चिंता ही होती. त्यावेळी आमचे सुख म्हणजे स्वतःच्या मनातील पातशाही अन्यायाविरुद्धचा तिरस्कार स्वराज्याप्रति शिवबाची जडणघडण हाच विचार त्यांच्या मनात होता..
जिजाऊंनी सुलतानी राजवटीमुळे गांजलेल्या अनेक स्त्रियांना आसरा दिला होता. देवाला मनोभावे नमस्कार करताना दर्ग्यात ही डोके टेकवण्याचे संस्कार त्यांनी शिवबा वर केले.केवळस्वराज्यासाठी शिवबाला घडवताना एक स्त्री म्हणून कौटुंबिक विरहही त्यांनी सहन केला.
अफजलखान, पन्हाळा ,आग्र्याची कैद इत्यादी घटनांच्या वेळी मुलाच्या काळजीने व्याकुळ झालेला आईचा जीव. तर तीचआई त्याच वेळी सूनांसाठी बनलेली भक्कम आधार, आईविना असलेल्यासंभाजी नातवाला वाढवताना बनलेली स्नेहल आजी, तर पुत्र संभाजीच्या मृत्यूने सैरभैर झालेली माता अशा अनेक भूमिका त्यांनी तोल जाऊ न देता खंबीरपणे, प्रसंगावधान राखून निभावल्या. वेळप्रसंगी हातात समशेर घेतली. केवळ मराठा जमवावा, याच हेतूने तत्कालीन समाजाचा अभ्यास करून शिवरायांची आठ लग्ने करण्यामागची त्यांची दूरदृष्टी ही काही औरच!
पातशाही टिकवण्यासाठी व शिवरायांच्या स्वराज्याला आवर घालण्यासाठी पातशहाने अनेक सरदार स्वराज्यावर पाठवले. त्यामुळे जिजाबाईंना सतत भीती वाटायची एखाद्यावेळी पातशहाने शहाजीराजांना स्वराज्यावर धाडलं तर?????.. पिता विरुद्ध पुत्र असा संघर्ष उभा राहिला तर? तर स्वारी काय करेल? या विचाराने त्यांच्या मनात कुरुक्षेत्रावरचा प्रसंग उभा राहतो. अर्जुनाला गीता ऐकवूनयुद्धाससज्जकरणाऱ्या कृष्णाचा प्रसंग. अन्याय,, असत्य,, अनिती विरुद्ध लढण्यास प्रवृत्त करणारा प्रसंग. हाच प्रसंग शिवबालाबालपणी अनेक वेळा ऐकवून आम्हीही मोठेपणी अन्याय,असत्य, अनिती विरुद्ध लढताना स्वकीयांचा ही मुलाहिजा ठेवणार नाही, असे संस्काराचे बीज त्यांनी शिवबा मध्ये रोवले होते. त्यामुळे पिता विरुद्ध पुत्र या संघर्षाची कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती…कारण…… कारण विजय कोणाचाही झाला तरी हार माझीच!! असे त्यांना वाटे.परंतु पातशहाने अशी वेळच येऊ दिली नाही. शहाजी+ शिवाजी =पातशाही उलथन हे सूत्र पातशहाने कदाचित ओळखले असावे.
राज्याभिषेक प्रसंगी खर्च भरून काढण्यासाठी त्यांनी आधीपासूनच बचतीचा मार्ग स्वीकारला होता. राज्याभिषेकानंतर अवघ्या बारा दिवसात या राजमातेचा मृत्यू झाला.
जिजाबाईंनी तत्कालीन समाजाचा अभ्यास करून, तत्कालीन समाजाच्या गरजा ओळखून, स्वत:च्या अनेक वैयक्तिक सुखांना पारखे होऊन शिवबाला घडविले. त्याच प्रमाणे आज आपणही आजच्या समाजाचा अभ्यास करून, आजच्या काळाची गरज ओळखून, आपल्या शिवबाला
आजच्या समाजातसत्य,न्याय, नीतीच्या भक्कम पायावर उभे करण्यासाठी, माता व पुत्र यांच्या कर्तृत्वाची अग्निरेखा आणखी ठळक करण्यासाठी अशीच शिवाजीहीव्यक्तीनव्हे,तरशिवाजीही वृत्ती निर्माण केलीपाहिजे.
शिवाजीमहाराजयाव्यक्तिमत्वाची त्यांच्या कार्यातूनओळखहोण्यासाठी त्यांची अशाच प्रकारे जडणघडण करणाऱ्या या राजमातेला त्रिवार वंदन !!!
वंदना कदम
लेखिका नवीन मराठी शाळा पुणे येथे शिक्षिका आहेत.
संदर्भ – अग्निरेखा लेखक अनंत तिबिले
सौजन्य – विश्व संवाद केंद्र,पुणे