शरद मोहोळ खुनाच्या कटात सहभागी असलेल्या आणि पिस्तुलखरेदीसाठी आर्थिक मदत करणाऱ्या तिघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. आदित्य गोळे (वय २४), नितीन खैरे आणि अन्य एकाला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे.पाच जानेवारीला सुतारदरा येथे राहत्या घराजवळ मोहोळ याचा गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. पोळेकर आणि आणखी दोघांनी मोहोळवर गोळ्या झाडल्या होत्या. मोहोळचा खून करण्यासाठी आरोपींनी एक महिन्यापूर्वी कट रचला होता. त्यासाठी आरोपींनी मुळशी तालुक्यातील हाडशी परिसरात गोळीबाराचा सराव केला होता. त्यावेळी आरोपी खैरे हा मुन्ना पोळेकरसोबत तेथे हजर होता.