आज उद्धव ठाकरेंनी ‘जनता
न्यायालय‘ या
नावाने एका महापत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. ही पत्रकार परिषद विधानसभा
अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर बोलण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या पत्रकार परिषदेला
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील पत्रकार परिषद घेऊन आपले म्हणणे मांडणार
आहेत.
१० जानेवारी २०२४ रोजी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर आपला निकाल दिला आहे. या निकालामध्ये त्यांनी
शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचे नार्वेकरांनी स्पष्ट केले आहे. तसेच दोन्ही
गटाच्या आमदारांना त्यांनी पात्र ठरवले आहे. तसेच भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून
निवड देखील त्यांनी मान्य केली आहे. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गटाने
आव्हान दिले आहे.
निकालामध्ये विसंगती कशी आहे व त्यांनी न्यायालयाच्या निर्देशांचे पालन केले नाही
असा आरोप ठाकरे गटाने केला आहे. त्यासाठी वरळी येथे ठाकर गटाने महापत्रकार
परिषदेचे आयोजन केले आहे. या पत्रकार परिषदेला अध्यक्ष राहुल नार्वेकर देखील
पत्रकार परिषद घेऊन आपले म्हणणे मांडणार आहेत.