काल उद्धव ठाकरे यांनी ‘जनता न्यायालय’ या नावाने महापत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यामध्ये त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल कसा चुकीचा आहे, हे जनतेला दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या पत्रकार परिषदेला राहुल नार्वेकर यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन आपले म्हणणे जनतेसमोर मांडले आहे. निर्णय देताना काही माझ्याकडून राहिले असेल, किंवा चुकले असेल त्यावर बोलले जाईल अशी अपेक्षा मला होती. मात्र त्यातील काहीच घडले नाही असे राहुल नार्वेकर यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी १० जानेवारी रोजी शिवसेना आमदार आपात्रता प्रकरणावर आपला निकाल दिला. निकाल देताना त्यांची शिवसेनेची १९९९ ची घटना ग्राह्य धरत एकनाथ शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिला आहे. तसेच त्यांनी दोन्ही गटांच्या आमदारांना पात्र ठरवले आहे. त्याविरोधात ठाकरे गट आक्रमक जल आहे. त्यांनी महापत्रकार परिषद घेऊन घेऊन हा निर्णय कसा चुकीचा आहे हे जनतेला दाखवले. अगदी वकिलांनी देखील यावर भाष्य केले. वकिल असीम सरोदे यांनी या प्रकरणातील तत्कालीन राज्यपालांचा उल्लेख फालतू असा केला. संजय राऊत , ठाकरे यांनी देखील विधानसभा अध्यक्षांवर जोरदळ हल्लाबोल केला. अनिल परब यांनी सावर कागदपत्रे निवडणूक आयोगाला दिली असल्याचे पुरावे दाखवले. या पत्रकार परिषदेला राहुल नार्वेकर पत्रकार परिषदेतूनच प्रत्युत्तर दिले आहे.
राहुल नार्वेकर आपल्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले, ”गेले पाच ते सहा दिवस जे निकालाबाबत आरोप केले जात आहेत, त्यावर खुलासा करण्याचा प्रयत्न मी करत आहे. मी निकाल देता सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन केले नाही असे ते म्हणत आहेत . मात्र कोर्टाच्या आदेशाबाहेर जाऊन मी कोणता निर्णय घेतला हे त्यांनी सांगितले नाही. मला वाटले माझ्याकडून काही राहिले असेल तर त्यावर बोलले जाईल. मात्र त्यांनी राज्यपालांना फालतू म्हणणे, निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट असा सांविधानिक संस्थाविषयी चुकीचे शब्द वापरले. अनिल परब सातत्याने एक पत्र माध्यमांसमोर दाखवतात, मात्र त्यात काय लिहिले आहे हे ते दाखवत नाहीत. कारण सुधारित घटनेबाबत त्या पत्रात उल्लेख करण्यात आलेल नाही आहे.” तसेच मी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच निकाल दिला आहे असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.