विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १० जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर आपला निकाल दिला आहे. यामध्ये त्यांनी शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिल आहे. तसेच भरत गोगावले यांचा व्हीप ठाकरे गटाच्या आमदारांना योग्य प्रकारे लागू झाला नसल्याचे सांगत ठाकरे गटाच्या आमदारांना देखील पात्र ठरवले आहे. या निर्णयाविरोधात शिंदे गटाने उच्च न्यायालयात याचिका देखील केली होती. त्यावर आजची सुनावणी पूर्ण झाली आहे. तसेच न्यायालयाने सर्व प्रतिवाद्यांना नोटिस धाडली आहे. तसेच ८ फेब्रुवारी पर्यन्त या नोटीसीला उत्तर देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
या निकालाविरोधात शिंदे गटाने ठाकरेंच्या आमदारांविरोधात १३ याचिका दाखल केल्या होत्या. त्या १३ याचिकांवर तातडीची सुनावणी पार पडली. शिंदे गटाने केलेल्या याचिकांमध्ये ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली आहे. तसेच शिंदेंची शिवसेना खरी असेल तर त्यांचा व्हीप कसा लागू होत नाही? व्हीपचे पालन न करणाऱ्या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करा अशी याचिका शिंदे गटाने उच्च न्यायालयात केली आहे.
दरम्यान, दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी १० जानेवारी रोजी शिवसेना आमदार आपात्रता प्रकरणावर आपला निकाल दिला. निकाल देताना त्यांची शिवसेनेची १९९९ ची घटना ग्राह्य धरत एकनाथ शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्णय दिला आहे. तसेच त्यांनी दोन्ही गटांच्या आमदारांना पात्र ठरवले आहे. तसेच भरत गोगावले यांचा व्हीप ठाकरे गटाच्या आमदारांना योग्य रित्या लागू झाला नसल्याचे सांगत त्यांनी ठाकरेंच्या आमदारांना पात्र ठरवले. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे.