जगातील सर्वात मोठा ‘दशरथ दीपक’ आज संध्याकाळी अयोध्येमध्ये प्रज्वलित होणार आहे. 22 तारखेच्या प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर या दीपकाचे आजपासून प्रज्वलन होणार आहे. अयोध्येत राम जन्मभूमी मंदिरामध्ये पूजेसह विविध विधी सुरु झाले आहेत.त्याचाच एक भाग ह्या दिव्याचे प्रज्वलन असणार आहे.
ह्या दिव्याला २८ मीटरचा व्यास असून त्यासाठी 21 हजार लिटर तेल जनकपुर येथून आणले आहे.ह्या दिव्याला बनवण्यासाठी तीर्थस्थानांवरची माती तसेच पवित्र नद्यांच्या आणि समुद्राच्या पाण्याचा वापर करण्यात आला आहे तसेच १२५ किलो कापसापासून या दिव्याची ज्योत बनवण्यात आली आहे.
प्रभू श्रीराम परिवारासह ज्या जागेवर पूजेकरिता येत असत त्याच रामघाट वरील तुलसीबाडी इथे हा महाकाय दिवा प्रज्वलित करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. १०८ जणांनी मिळून हा दिवा बनवला असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या दिव्याची नोंद घेतली जाईल असे सांगण्यात येत आहे. या दिव्यासाठी एकूण ७. ५ करोड एवढा खर्च करण्यात आला आहे