बिहारमध्ये दोन दिवसांपूर्वी राजकीय भूकंप घडला घडला. लालू प्रसाद यादव यांच्याबरोबर सत्तेत असलेले नितीश कुमार यांनी युती तोडली. त्यानंतर त्यांनी पुन्हा भाजपासोबत एकत्र येऊन सरकार स्थापन केले. म्हणजेच आता नितीश कुमार एनडीएमध्ये आल्याने ‘इंडिया’ आघाडीला मोठा धक्का मानला जात आहे. मात्र या सर्व राजकीय घडामोडींवर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. बिहारमध्ये केली जाणाऱ्या जातगणनेमुळे नितीश कुमार हे ‘इंडिया’ आघाडीतून बाहेर पडले, अशी राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
”नितीशजी यामध्ये का अडकले ते समजून घ्या. मी त्यांना सरळ सांगितले की, तुम्हाला बिहारमध्ये जातगणना करावी लागेल. त्यानंतर आम्ही आरजेडीसह नितीशजींनी सर्वेक्षण करण्याचा आग्रह धरला. पण भाजप घाबरला. त्यांनी या योजनेला विरोध केला. नितीशजी यात अडकले आणि भाजपाने त्यांना पळून जाण्यासाठी मागच्या दाराची सोया केली,” असे राहुल गांधी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, ”तुम्हाला सर्वांना सामाजिक न्याय देण्याची जबाबदारी आमच्या ‘इंडिया’आघाडीची आहे. त्यासाठी आम्हाला नितीशजींची गरज नाही.” नितीश कुमार यांनी रविवारी नवव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या या भाजपाबरोबरच्या सरकारमध्ये भाजपा नेते सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. ”सर्व काही ठीक नसल्याने” राज्यात ही राजकीय परिस्थिती उद्भवली आहे. राहुल गांधी यांनी मात्र नितीश कुमार यांनी “थोड्याशा दबावाला” बळी पडून ‘यू-टर्न’ घेण्याचा निर्णय घेतल्याचा दावा केला.