भारत आणि इंग्लंड यांच्यामध्ये पाच कसोटी सामन्यांची मालिका २५ जानेवारीपासून सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना हैद्राबाद येथे खेळवला जात आहे. कसोटी सामन्यामध्ये भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वालने कसोटी सामन्याचा दुसरा दिवस आपल्या नावावर कोरला. कारण दुसऱ्या दिवशी यशस्वीने आपले धडाकेबाज द्विशतक पूर्ण केले. २२ वर्षे ७७ दिवस इतके वय असणाऱ्या यशस्वीने केवळ २७७ चेंडूंमध्ये हा विक्रम पूर्ण केला आहे. तसेच या कसोटीच्या पहिल्या डावात भारताने ३५० पेक्षा जास्त धाव केल्या आहेत.
यशस्वी जैस्वाल हा भारताच्या पहिल्या डावामध्ये उत्कृष्ट फलंदाज होता. जैस्वालनंतर भारतीय फलंदाजाची दुसरी सर्वोच्च धावसंख्या फक्त ३४ होती. ती सुद्धा शुभमन गिलची. जो प्रभावी दिसत होता परंतु त्याच्या डावाचे मोठ्या खेळात रूपांतर करण्यात अपयशी ठरला. जैस्वालने आपल्या द्विशतकात १८ चौकार आणि ७ षटकार ठोकले. यापूर्वी, वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पणात जयस्वालची सर्वोच्च धावसंख्या १७१ इतकी होती.
कसोटीमध्ये द्विशतक ठोकणारा यशस्वी जैस्वाल हा चौथा डावखुरा फलंदाज आहे. विनोद कांबळी, सौरव गांगुली आणि गौतम गंभीर यांनी याआधी हे विक्रम केले आहेत. यशस्वी जैस्वालने पहिल्या ४ शतकांमध्ये २७ धावा केल्या. त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. या सामन्यात इंग्लडला पहिल्या डावांमध्ये केवळ २४६ धावा करता आल्या होत्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपताना भारताने १ बाद ११९ धावा केल्या होत्या.