अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर शरद पवार गटाला नव्या नावासाठी आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाला काही पर्याय द्यायचे होते. यामध्ये शऱद पवार गटाकडून पक्षाच्या नावासाठी नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी शरदरावर पवार ही तीन नावे देण्यात आली होती. त्यामध्ये निवडणूक आयागाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव त्यांना दिले आहे. त्यानंतर आता शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला पक्षासाठी तीन चिन्हे सुचवली आहेत.
शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे तीन चिन्हांचा प्रस्ताव पाठवला आहे. यामध्ये शिट्टी, कपबशी आणि वडाचे झाड या नावांचा समावेश आहे.
आता निवडणूक आयोगाला शरद पवार गटाने तीन चिन्ह सुचवली असून यातील कोणते चिन्ह त्यांना मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, अजित पवारांच्या बाजूने निकाल देत निवडणूक आयोगाने शरद पवारांना मोठा धक्का दिला होता. तर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला स्वतंत्र गट म्हणून मान्यता दिली आहे. तसेच येत्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला तीन नावे आणि तीन चिन्हांचे पर्याय सादर करण्यास सांगितले आहे. यामध्ये शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव मिळाले असून आता त्यांनी निवडणूक आयोगाला तीन चिन्हांचे पर्याय दिले आहेत.