पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. पंतप्रधान मोदी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘विक्षित भारत विकसित राजस्थान’ कार्यक्रमाला संबोधित करत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, ”देश आत्मविश्वासाने पुढे जात आहे.” मात्र जुन्या पक्षाच्या “भ्रष्ट” राजवटीत भारत अयशस्वी ठरला. यावर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. त्याआधी मोदी बोलत होते. ते म्हणाले, ”काँग्रेस भ्रष्ट आहे. ते भविष्याचा विचार करू शकत नाहीत. काँग्रेसच्या नेतृत्वाखाली भारताची भरभराट होऊ शकली नाही”
काँग्रेसवर निशाणा साधताना पंतप्रधान पुढे म्हणाले, ”स्वातंत्र्यानंतर आज हा सुवर्णकाळ आला आहे. भारताजवळ १० वर्षांपूर्वीच्या निराशा मागे टाकण्याची ही संधी आहे. भारत आता आत्मविश्वासाने पुढे जात आहे. २०१४ पूर्वी फक्त घोटाळे आणि बॉम्ब स्फोटाच्या चर्चा होयच्या. भारतातील लोक विचार करत असत की आपले आणि देशाचे काय होईल. काँग्रेसच्या राजवटीत असे वातावरण होते…”
”काँग्रेसचा एकच अजेंडा आहे. तो म्हणजे मोदीचा विरोध, टोकाचा मोदीविरोध. ते मोदींविरोधात अशा गोष्टी पसरवतात, ज्यामुळे समाजात फूट पडते. जेव्हा एखादा पक्ष घराणेशाही आणि घराणेशाहीच्या दुष्ट चक्रात अडकतो, तेव्हा त्याचेही तेच होते. आज सर्वजण काँग्रेस सोडत आहेत, तिथे फक्त एकच कुटुंब दिसत आहे”, असे मोदी म्हणाले.
26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे भव्य स्वागत केल्याबद्दल त्यांनी राजस्थानच्या जनतेचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा कार्यक्रम राजस्थानमधील सर्व जिल्ह्यांमध्ये सुमारे २०० ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. राज्यव्यापी कार्यक्रमात विविध शासकीय योजनांचे लाखो लाभार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला राजस्थानचे मुख्यमंत्री, राजस्थानचे सरकारचे इतर मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील प्रतिनिधी देखील सामील झाले होते.