बॉलिवूडचे प्रसिद्ध जोडपे रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी विवाहबंधनात अडकले आहेत. रकुल आणि जॅकीने बुधवारी (21 फेब्रुवारी) गोव्यात कुटुंब आणि मित्रपरिवारासोबत लग्नगाठ बांधली. आता या जोडप्याने त्यांच्या लग्नाचे फोटो शेअर करून त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे.
रकुल प्रीत सिंग ही शीख कुटुंबातील आहे तर जॅकी भगनानी हा सिंधी कुटुंबातील आहे, त्यामुळे या जोडप्याने दोन्ही रितीरिवाजांनुसार लग्न केले आहे. त्यांचा हा खास विवाहसोहळा गोव्यात थाटामाटात पार पडला.
या खास प्रसंगी रकुल प्रीत सिंहने पीच कलरचा लेहेंगा परिधान केला होता, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तर जॅकीने क्रीम रंगाची शेरवानी परिधान केली होती ज्यामध्ये तो देखील एकदम हँडसम दिसत होता.
रकुल आणि जॅकीने त्यांच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर आता त्यांचे चाहते आणि बॉलिवूड सेलिब्रिटी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. तसेच या दोघांच्या लग्नातील काही खास फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.