पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीमधील भारत मंडपममध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये सहकारी क्षेत्रासाठी अनेक नवीन महत्त्वाच्या उपक्रमांचा शुभारंभ केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सहकारी क्षेत्रातील’ जगातील सर्वत क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजने’च्या पायलट प्रकल्पाचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले जे ११ राज्यात ११ 11 प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS) मध्ये केले जाणार आहे. यावेळी बोलताना, केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शहा यांनी PACS मजबूत करण्यासाठी गुंतवणूक सुलभ केल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले.
“PACS मजबूत करण्यासाठी, PM मोदीजींनी २,५०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यासाठी मी मोदीजींचे आभार मानतो. आज 18 हजार PACS लॉन्च केले जात आहेत. यासोबतच जगातील सर्वात मोठी धान्य साठवणूक योजना देखील सुरू केली जात आहे”, असे अमित शाह म्हणाले. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या उपक्रमांतर्गत गोदामे आणि इतर कृषी पायाभूत सुविधांच्या बांधकामासाठी देशभरात अतिरिक्त ५०० PACS ची पायाभरणी केली.
या उपक्रमाचे उद्दिष्ट PACS गोदामांना अन्नधान्य पुरवठा साखळीसह अखंडपणे एकत्रित करणे, अन्न सुरक्षा मजबूत करणे आणि नाबार्डद्वारे समर्थित आणि राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC) यांच्या नेतृत्वाखालील सहकार्याने देशातील आर्थिक विकासाला चालना देणे हे आहे. हा उपक्रम विविध विद्यमान योजना जसे की कृषी पायाभूत सुविधा निधी (AIF), कृषी विपणन पायाभूत सुविधा (AMI) इत्यादींच्या अभिसरणाद्वारे राबविण्यात येत आहे, ज्यामुळे प्रकल्पामध्ये सहभागी होणाऱ्या PACS ला पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सबसिडी आणि व्याज सवलतीचे फायदे मिळू शकतील.
सहकार क्षेत्राला नवसंजीवनी देण्याच्याआणि शेतकऱ्यांचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने ‘सहकार से समृद्धी’ या सरकारच्या संकल्पनेला अनुसरून देशभरातील १८,००० PACS मध्ये संगणकीकरणाच्या प्रकल्पाचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. या प्रकल्पाला २,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक खर्चासह मंजुरी देण्यात आली आहे.