राज्यात आजपासून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू होणार आहे. १ मार्च म्हणजे आजपासून परीक्षा सुरू होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे ही परीक्षा होणार आहे. राज्यातील १६ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी दहावीच्या परीक्षा डिअर आहेत. ही परीक्षा राज्यातील ५ हजारांपेक्षा जास्त केंद्रावर परीक्षा होणार आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना ऋतं परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे,नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर,मुंबई, कोल्हापूर, अमरावती , नाशिक, लातूर, कोकण अशा ९ मंडळावर परीक्षा होणार आहे. परीक्षा सुरु होण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी अर्धा तास परीक्षा केंद्रावर येणे आवश्यक आहे. म्हणजेच सकाळी ११ वाजता पेपर असल्य्यास विद्यार्थ्यांनी १०.३० वाजता विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.
प्रश्नपत्रिकेची गोपनीयता राखण्यासाठी मुख्य परीक्षा केंद्रापर्यंत, उत्तरपत्रिका आणण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सहाय्यक परीक्षक यांनी जीपीएस प्रणाली सुरू ठेवणे आवश्यक आहे. यंदा परीक्षा सुरु होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी दिली जाणारी १० अतिरिक्त मिनिटे यंदा बोर्डाकडून दिली जाणार नाहीत. याउलट विद्यार्थ्यांना आता परीक्षेच्या शेवटी प्रश्नपत्रिका पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त १० मिनिटे वेळ दिला जाणारे आहे.