पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (10 एप्रिल) विरोधकांवर जोरदार टीका केली. लोकसभा निवडणुकीत भाजपचा (BJP) सामना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या युतीचा “भारताच्या सामर्थ्यावर विश्वास नाही”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. तामिळनाडूतील मेट्टुपलायम येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील सत्ताधारी पक्ष द्रमुक आणि काँग्रेसवर खोटे बोलून सरकारमध्ये राहण्याचा एकच अजेंडा असल्याचा आरोप केला.
“इंडिया युतीला भारताच्या सामर्थ्यावर विश्वास नाही. कोरोनाची एवढी मोठी महामारी जगात आली. INDI आघाडीचे लोक म्हणायचे की भारत लस बनवू शकत नाही. आम्ही म्हणालो की आम्ही मेड इन इंडिया लस बनवू. भारताने नुसती लस बनवली नाही. भारताने केवळ लस दिली नाही तर कोट्यवधी लोकांचे जीवही त्यांना मोफत लस देऊन वाचवले,” असे पंतप्रधान म्हणाले.
पुढे पंतप्रधान मोदी म्हणाले, अनेक दशके सत्तेत राहिलेला पक्ष देशातून गरिबी हटवू शकला नाही, असा टोलाही त्यांनी काँग्रेसवर लगावला. “द्रमुक आणि काँग्रेससारख्या कौटुंबिक पक्षांचा एकच अजेंडा आहे, खोटे बोलून सरकारमध्ये राहा. काँग्रेसने इतकी दशके गरीबी हटवण्याचा नारा दिला, पण गरिबी हटली नाही. हे एनडीए सरकार आहे, ज्याने पंचवीस कोटी आणले आणि लोकांना गरिबीतून बाहेर काढले.”
भाजपने पहिल्यांदाच एका आदिवासी महिलेला भारताचा राष्ट्रपती बनवले, असे वक्तव्य करून पंतप्रधान म्हणाले, “या कुटुंब पक्षांना वाटते की त्यांच्या मुला-मुलींशिवाय कोणीही गरीब किंवा आदिवासी उच्च पदावर राहू शकत नाही. पण भाजपने आदिवासी महिलेला राष्ट्रपती केले. पण त्यावेळी देखील इंडिया आघाडीच्या लोकांनी याला कडाडून विरोध केला होता.”
काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान म्हणाले की, “काँग्रेस सत्तेत असताना कोणत्या पक्षाची सत्ता होती, या आधारावर राज्यांमध्ये भेदभाव केला जात होता. पण एनडीए सरकार ‘सबका साथ, सबका विकास’ या संकल्पनेवर काम करत आहे. विकसित भारतासाठी विकसित तमिळनाडू आम्ही म्हणतो. त्यामुळेच आम्ही गेल्या 10 वर्षात तामिळनाडूच्या विकासासाठी लाखो आणि कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे”, असेही पंतप्रधान म्हणाले.