लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर समाजवादी पक्ष आणि काँग्रेस हे अनुक्रमे ‘संपलेली पार्टी’ आणि ‘कोण काँग्रेस’ म्हणून ओळखले जातील, अशी टीका संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज (10 एप्रिल) केली.
सहारनपूर येथे एका निवडणूक सभेत संबोधित करताना संरक्षणमंत्र्यांनी विरोधकांच्या अवस्थेचा खरपूस समाचार घेतला आणि ते म्हणाले, “समाजवादी पक्षाची अशी अवस्था आहे की ते सोमवार ते रविवार आपले उमेदवार बदलत राहतात. आणि काँग्रेसला उमेदवार शोधता येत नाही. 2024 च्या निवडणुकीच्या निकालानंतर सपा ‘संपलेली पार्टी आणि काँग्रेस ‘कौन काँग्रेस’ म्हणून ओळखले जातील.
2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या आधी जातीय समीकरण संतुलित करण्यासाठी राजनाथ सिंह यांनी पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये तीन निवडणूक सभांना संबोधित केले.
राजनाथ सिंह म्हणाले, “2017 मध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने मागास जाती भाजपवर नाराज असल्याचे आख्यान पसरवले. 2019 मध्ये ब्राह्मण भाजपवर नाराज असल्याचे आख्यान पसरवले गेले. 2022 मध्ये जाट भाजपवर नाराज असल्याचे आख्यान पसरवले गेले. आणि 2024 मध्ये, त्यांनी (सपा आणि काँग्रेस) पुन्हा राजपूत भाजपवर नाराज असल्याची कथा पसरवण्याचा प्रयत्न केला आहे.”
“विरोधक हे मान्य करण्यास नकार देत आहेत की संपूर्ण उत्तर प्रदेश राज्य त्यांच्यावर नाराज आहे. जर काही समस्या असेल तर भाजप त्याची काळजी घेण्यास सक्षम आहे. सपा आणि काँग्रेस कोणत्याही समस्येवर तोडगा काढण्यास असमर्थ आहेत,” असे राजनाथ सिंह म्हणाले.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न मांडताना ते म्हणाले की, भाजप सरकारने नेहमीच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले आहेत. मला खात्री आहे की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शेतकऱ्यांच्या समस्या असतील तर त्यांची काळजी घेतील, असेही संरक्षण मंत्री म्हणाले.