लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराला चांगलीच धार चढली आहे.
एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. दरम्यान केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ
सिंह यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेस हे एक बुडणारे जहाज असून, त्याच्या
तळाला छिद्र आहे. जगातील कोणतीही शक्ती त्याला बुडण्यापासून रोखू शकत नाही,
अशी
टीका राजनाथ सिंहांनी केली आहे.
राजनाथ सिंह मध्य प्रदेशमधील खांडवामध्ये बोलत
होते.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी
गांधी कुटुंबावर निशाणा साधला. ”स्वातंत्र्यानंतर महात्मा गांधी
म्हणाले होते, की देशात लोकशाही स्थापन झाली आहे. च काँग्रेस विसर्जित करण्याची वेळ
आली आहे, परंतु काँग्रेसच्या नेत्यांनी महात्मा गांधींच्या विनंतीकडे दुर्लक्ष
केले. मला वाटते की या देशातील जनतेने महात्मा गांधींनी काँग्रेसबद्दल जे सांगितले
होते ते पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ते (लोक) काँग्रेसला देशातून नक्कीच
नष्ट करतील. देशात एकूण ७ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. आतापर्यंत २ टप्प्यांतील
मतदान पूर्ण झाले आहे. तर ४ जून रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.