लोकसभा निवडणुकीच्या आजच्या तिसऱ्या टप्प्यात सकाळी 9:00 वाजेपर्यंत पश्चिम बंगालमध्ये 14.60 टक्के मतदान झाले, असे निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार समोर आले आहे.
तसेच मध्य प्रदेशातही सर्वाधिक 14.22 टक्के मतदान झाले आहे. मात्र महाराष्ट्रात सकाळी 9 वाजेपर्यंत सर्वात कमी 6.64 टक्के मतदान झाले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सकाळी 9 वाजता सहभागी होणाऱ्या इतर राज्यांसाठी मतदानाची टक्केवारी अशी आहे- आसाम–10.12 टक्के, बिहार-10.03 टक्के, छत्तीसगड–13.24 टक्के, गोवा-12.35 टक्के, गुजरात –9.87, कर्नाटक–9.45 टक्के, आणि उत्तर प्रदेश–12.13 टक्के.
केंद्रशासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीवमध्ये सकाळी 9 वाजेपर्यंत 10.13 टक्के मतदान झाले.2019 च्या लोकसभा निवडणुकीत एकूण मतदान 67 टक्क्यांहून अधिक होते.
आज सकाळी ७ वाजता सार्वत्रिक निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील ९३ लोकसभा जागांसाठी मतदान सुरू झाले.
या टप्प्यात सुमारे 120 महिलांसह 1300 हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत. “या टप्प्यात 1.85 लाख मतदान केंद्रांवर एकूण 17.24 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावण्यास पात्र आहेत.
आजच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रमुख नेत्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि दिग्विजय सिंह, नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया, समाजवादी पक्षाच्या नेत्या डिंपल यादव आणि राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासह नेत्यांचा समावेश आहे.