Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत असून राज्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया सुरू आहे. आज सकाळपासून सर्वसामान्य जनतेसह अनेक सेलिब्रिटी, राजकीय नेते मतदानाचा हक्क बजावत आहेत. तर आता दुपारी एक वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे.
सकाळी 7 ते दुपारी 1 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर आली आहे. देशात एक वाजेपर्यंत एकूण 39.92 टक्के मतदान झालं आहे. तर या आकडेवारीत महाराष्ट्र अजूनही मागे आहे.
1 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी
पश्चिम बंगाल – 49.27%
आसाम – 45.88%
छत्तीसगड – 46.14%
मध्य प्रदेश – 44.67%
कर्नाटक – 41.59%
बिहार – 36.69%
दादर-नगर हवेली आणि दमण दीव – 39.94%
गोवा – 49.04%
गुजरात – 37.83%
उत्तर प्रदेश – 38.12%
महाराष्ट्र – 31.55%