राष्ट्रीय स्वयंसेविका समितीच्या सेविकांना मार्गदर्शन
धर्म, संस्कृती, परंपरा व मूल्य यांचे रक्षण करणे महणजेच राष्ट्रकार्य होय. “रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग” असा मंत्र संत तुकाराम महाराजांनी सांगितला आहे.त्यामुळे आपण कठोर बनून थोडा वेळ हा राष्ट्रकार्यासाठी राखून ठेवायचा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकारिणी सदस्य मा. भैय्याजी जोशी यांनी येथे केले.
राष्ट्र सेविका समितीच्या सेविकांसाठी “राष्ट्रकार्यात मातृशक्तीचा सहभाग” या विषयावर एका विशेष बौद्धिक वर्गाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
सुदर्शन लॉन्स, वडाळा पाथर्डी रोड, इंदिरानगर येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून ते बोलत होते. डॉ. रचनाताई खांडवे यांचे सेविकांच्या मनातील प्रश्न व भैय्याजी जोशी यांनी दिलेली उत्तरे असा हा संवादात्मक कार्यक्रम झाला. यावेळी समितीच्या क्षेत्र अधिकारी शोभा गोसावी, विभाग कार्यवाहिका शुभांगी कुलकर्णी, प्रांत संपर्क प्रमुख सोनीला राव तसेच विभाग सेवाप्रमुख रेखाताई दाणी उपस्थित होत्या.