संघाचं फडकं देशाचं निशाण होऊ शकत नाही, असे वादग्रस्त वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.यावरून आता महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स या सोशल मिडीयावर माध्यमावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे . पोस्टमध्ये म्हटले आहे की, “परम पवित्र भगवा ध्वज करोडो हिंदुंची अस्मिता आणि स्वाभिमान आहे. त्याला फडकं म्हणण्याचा नतदृष्टेपणा उद्धव ठाकरेंनी केला आहे.
अटल बिहारी वाजपेयींच्या कवितेचा दाखला देत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले आहे की .”परम पवित्र भगवा ध्वज करोडो हिंदुंची अस्मिता आणि स्वाभिमान आहे.त्याला फडकं म्हणण्याचा नतदृष्टेपणा उद्धव ठाकरेंनी केला.पण हाच भगवा झेंडा घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली होती. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ह्याच झेंड्याखाली शिवसेना उभारली पण उद्धव ठाकरेंना ते फडकं वाटतंय. आज बाळासाहेब ठाकरे असते तर भगव्या ध्वजाचा असा अपमान त्यांनी कधीच सहन केला नसता पण दुर्दैवानं सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी उद्धव ठाकरे भगव्याचा अवमान करत आहेत. उद्धव ठाकरे थोडी जनाची नाही तर मनाची लाज उरली असेल तर भगवा ध्वज काय आहे हे स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या शब्दात वाचा…”
कभी थे अकेले हुए आज इतने
नही तब डरे तो भला अब डरेंगे
विरोधों के सागर में चट्टान है हम
जो टकराएंगे मौत अपनी मरेंगे
लिया हाथ में ध्वज कभी न झुकेगा
कदम बढ रहा है कभी न रुकेगा
न सूरज के सम्मुख अंधेरा टिकेगा
निडर है सभी हम अमर है सभी हम
के सर पर हमारे वरदहस्त करता
गगन में लहरता है भगवा हमारा॥
भगव्या ध्वजाला फडकं म्हणून तुम्ही कितीही शिव्याशाप दिल्या तरी हाच भगवा सदैव आमचं रक्षण करणार आहे, असा टोला बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
https://x.com/cbawankule/status/1791306032230408256
काय म्हणाले आहेत उद्धव ठाकरे ?
एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे म्हणाले आहेत की,” नड्डा बोलले की देशात एकच पक्ष राहील. पूर्वी एक विधान, एक निशाण एक प्रधान आहे असे ते म्हणाले. आम्हाला वाटले होते की, तिरंग्यासाठी करत आहेत. पण स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे यांच्या कार्यालयावर तिरंगा फडकत नव्हता. यांचं फडकं फडकत होतं. ते फडकं देशाचं निशाण होऊ शकत नाही. आमच्या देशाचा तिरंगा हा तसाच राहणार आहे. संविधान तसेच राहणार आहे. पंतप्रधान लोकांनी निवडून दिलेलाच राहणार आहे. पुतीनसारखा निवडून येणार नाही”, अशी टीका त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ध्वजावर केली आहे. तसेच याच मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत त्यांनी याच मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिव्यांची लाखोली वाहिली आहे. .