देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस तीव्र होताना दिसून येत
आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीने एनडीएला यंदाच्या
निवडणुकीत पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. तर एनडीएने केंद्रात तिसऱ्यांदा सरकार
स्थापन करण्यासाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात
प्रचार सभांचा धडाका लावला आहे. तर नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान
करण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीने ४५ प्लस मिशन डोळ्यांसमोर ठेवले आहे. आज आपण
पालघर लोकसभा मतदारसंघाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तिथे महायुती आणि महाविकास
आघाडीने, वंचित बहुजन आघाडीने कोणाला
उमेदवारी दिली आहे. राजकीय ताकद कशी आहे.
तेथील प्रश्न कोणते आहेत, हे जाणून घेणार आहोत.
नमस्कार. मी तेजस भागवत. ऋतं मराठीमध्ये स्वागत आहे. आज आपण पालघर लोकसभा
मतदारसंघाविषयी जाणून घेणार आहोत. पालघरमध्ये यंदा तिरंगी लढत निर्माण झाली आहे.
बहुजन विकास आघाडी देखील यंदा पालघर लोकसभेत निवडणुकीसाठी उभा आहे. बविआ, भाजपा आणि ठाकरेंची शिवसेना अशी ही लढत
होणार आहे. या ठिकाणी मतांचे विभाजन हा फॅक्टर देखील महत्वाचा असणार आहे. यंदाच्या
निवडणुकीत महायुतीकडून हेमंत सावरा तर महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाने भारती
कामाडी यांना तिकीट दिले आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडी राजेश
पाटील यांना तिकीट दिले आहे.
पालघरमध्ये यंदा महायुतीमध्ये उमेदवारीवरून घोळ पाहायला मिळाला.
विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर नाराज
असलेले गावित भाजपात आले. या ठिकाणी हितेंद्र ठाकूर नेहमी सत्ताधारी पक्षाला साथ
देतात. मात्र यंदा आपला उमेदवार उभा केला आहे. भाजपाने त्यांची मनधरणी करण्याचे
प्रयत्न केले पण इतके यश आले नाही. मात्र ठाकूर यांच्या उमेदवाराचा फायदा भाजपा होऊ शकतो. म्हणजेच
मतांचे विभाजन भाजपच्या पथ्यावर पडू शकते.
महाविकास आघाडीने याआधीच जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि ठाकरे
गटाच्या नेत्या भारती कामाडी यांना तिकीट दिले आहे. उद्धव ठाकरेंनी याआधीच
प्रचाराला सुरुवात केली होती. वाढवण बंदराला विरोध आणि मराठी मते ही कामडी
यांच्यासाठी जमेची बाजू आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पाठिंबा यंदा ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे. वसई,
पालघर,
विक्रमगड,
डहाणू
आणि बोईसर हे विधानसभा ठाकरे गटासाठी मदतशीर असले तरी हितेंद्र ठाकूर यांच्या
पक्षाची कामगिरी कशी राहते यावर सर्वकाही अवलंबून राहणार आहे.
उमेदवारी जाहीर करण्यावरून महायुतीत गोंधळ पाहायला मिळाला. हेमंत
सावरा हे राजकारणात नवखे आहेत. पक्षाची
संघटना आणि प्रचार या मुद्द्यांवर
प्रयत्नशील आहेत. नालासोपारा, डहाणू आणि विक्रमगड इथून भाजपला मदत
मिळण्याची शक्यता आहे. या भागात उत्तर भारतीय मते असल्याने भाजपला मदत होऊ शकते.
पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीचे ३ आमदार आहेत. त्यामुळे कोणताही राजकीय पक्ष
त्यांनी कमी लेखण्याची चूक कधीच करताना दिसून येत नाही.
या ठिकाणी रेल्वे प्रवाशांच्या समस्या
मोठ्या प्रमाणात आहेत. सागरी महामार्गाचे काम अपूर्ण अवस्थेत आहे. ग्रामीण भागातील
पाण्याचे दुर्भिक्ष , त्यामुळे स्थलांतर आणि
कुपोषण, आरोग्य विषयक समस्या, येथील मच्छिमार बांधवांच्या समस्या,
असे
अनेक प्रश्न पालघर लोकसभेमध्ये निर्माण झाले आहेत. ते सोडवण्यासाठी किंवा करण्यासाठी जनता कोणाला साथ देणार हे आता ४ तारखेला स्पष्ट होईलच.