लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. देशभरात इंडिया आघाडी आणि एनडीए कडून मोठ्या प्रमाणात प्रचार सभा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे स्टार प्रचारक तसेच इंडिया आघाडीचे स्टार प्रचारक देशभरात सभा घेत आहेत. दरम्यान आतापर्यंत ४ टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. आता ५ व्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी होणार आहे. देशातील ६ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशातील ४९ जागांवर मतदान होणार आहे.
देशातील ओडिशा, महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, झारखंड आणि दोन केंद्र शासित प्रदेश या ठिकाणी मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशमधील १४ जागा, महाराष्ट्रातील १३ जागा, पश्चिम बंगालमधील ७ , बिहार आणि ओडिशामध्ये प्रत्येकी ५ जागांवर मतदान होणार आहे. जम्मू काश्मीर आणि लडाख मधील प्रत्येकी एका जागेवर मतदान होणार आहे.
दरम्यान देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एनडीएच्या प्रचारासाठी सभा घेतल्या आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, नितीन गडकरी अशा स्टार प्रचारकांनी देखील देशभरात एनडीएच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतल्या आहेत. दरम्यान ५ व्या टप्प्यासाठी आज प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.