लोकसभा निवडणुकीसाठी काल ५ व्या मतदान पार पडले. ५ व्या टप्प्यातील
मतदान पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर टीका केली आहे.
या टप्प्यात इंडिया आघाडीचा पूर्ण पराभव झाल्याचा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला
आहे. २१ व्या शतकातील भारत इंडिया आघाडीच्या ‘पापा‘ ला
सोबत घेऊन जाऊ शकत नाही असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल बिहारच्या दौऱ्यावर होते. यावेळी
त्यांनी चांपारण येथे प्रचार सभेला संबोधित केले. यावेळी मोदी म्हणाले, ”पाचव्या
टप्प्यात इंडिया आघाडी पूर्णपणे पराभूत झाली आहे. २१ व्या शतकातील भारत इंडिया
आघाडीच्या ‘पापा‘ ला सोबत घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळेच प्रत्येक निवडणुकीत जनता
काँग्रेससारख्या पक्षांवर जोरदार प्रहार करत आहे. ४ जून रोजी राजदच्या भ्रष्टाचार, तुष्टीकरणाचे
राजकारण यावर जनता जोरदार प्रहार करणार आहे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस
पक्षासह त्यांच्या सहकारी पक्षांवर देखील टीका केली आहे. सभेला संबोधित करताना
मोदी म्हणाले, ”60 वर्षात या लोकांनी मोठमोठे महाल बांधले आणि स्विस बँकेत खाती उघडली.
तुमच्याकडे पोट भरण्यासाठी अन्न नव्हते, पण या लोकांची कपाटं नोटांच्या बंडलांनी
भरलेली होती. गरीबांना शिकण्यासाठी शाळा नव्हती, पण त्यांची मुले
परदेशात शिकत राहिली, पण त्यामुळे त्यांना काही फरक पडला नाही.”