दोन ते तीन वर्षांपूर्वी कोरोना नावाच्या विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला होता. सगळ्या जगभरात लॉकडाऊन करण्याची वेळ आली होती. हळूहळू त्याचा प्रभाव कमी होत आहे. तर आता त्याचे संकट संपले असे वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनामुळे जगाची चिंता वाढली आहे. जगात नवीन कोरोना व्हेरिएंटमुळे चिंता वाढली असताना या नवीन व्हॅरिएंटने आता भारतात शिरकाव केला आहे. जगभराप्रमाणेच आता भारतात देखील कोरोनाच्या FLIRT व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आले आहेत.
भारतात FLIRT या नवीन कोरोना व्हेरिएंटच्या जवळपास ३०० रुग्णांची नोंद झाली आहे. यामधील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्र राज्यात आढळले आहेत. राज्यात ओमायक्रॉनच्या फ्लीर्ट व्हेरिएटचे सुमारे १०० च्या आसपास रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जगभरासह भारतात शिरकाव केलेल्या या नवीन कोरोना व्हेरिएंटने आता सर्वांच्या चिंतेत वाढ केली आहे. सिंगापूरमध्ये सापडलेला हा व्हेरिएंटमध्ये आता जगभरात सगळीकडे पसरताना दिसत आहे. त्यामुळे सर्वानी काळजी घेणे आवश्यक आहे.