केंद्रीय मंत्री आणि अमेठी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात नुकत्याच सिद्ध झालेल्या मनीष सिसोदिया यांच्यावरचा भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर आम आदमी पक्षावर जोरदार हल्ला चढवला आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी आम आदमी पार्टीचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी मद्य धोरण प्रकरणांमध्ये दाखल केलेल्या जामीन याचिका फेटाळून लावल्या आणि म्हटले की, फिर्यादीविरोधात मनी लाँड्रिंगची “प्रथम दर्शनी केस” उभी राहात आहे.
पत्रकार परिषदेला संबोधित करताना, इराणी यांनी न्यायालयाच्या निरीक्षणांवर प्रकाश टाकला, असे म्हटले की, “मनीष सिसोदिया यांच्याबाबतचा एक निर्णय काल लोकांसमोर आला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाला प्रथमदर्शनी मनीष सिसोदिया यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे आढळून आले आहेत. १०० कोटींचा भ्रष्टाचार झाला असून आपचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि या प्रकरणातील सर्व आरोपींनी कोट्यवधींचा गंडा घातला आहे.
न्यायालयाने सिसोदिया यांनी पुरावे नष्ट करण्याचा आणि संभाव्य साक्षीदारांना, विशेषत: AAP विरुद्ध साक्ष देण्यास इच्छुक असलेल्यांना धमकावण्याचा प्रयत्न केल्याचे मान्य केले आहे.
“दिल्ली उच्च न्यायालयाची निरीक्षणे आता सगळ्यांसमोर आली आहेत , माझे नागरिकांना आवाहन आहे की मनीष सिसोदिया आणि ‘आप’च्या भ्रष्टाचाराबाबतची ही ठोस निरीक्षणे वाचावीत. हे तथाकथित राजकीय कार्यकर्ते परिवर्तनाचे आश्वासन देऊन सत्तेच्या स्पर्धेत घुसले पण जनतेच्या तिजोरीची लूट लुटेरे अश्या रूपात जनतेसमोर आले आहेत”. असे म्हणत स्मृती इराणीं यांनी आप वर हल्ला चढविला आहे.