उजनी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये २१ मे रोजी बोट उलटून ६ जण बेपत्ता झाले
होते. त्या ६ जणांना शोधण्यासाठी गेले ४० तास शोधमोहीम राबविण्यात आली. यावेळी
अखेरीस ६ जणांचे मृतदेह बचाव कार्य करणाऱ्या पथकाला सापडले आहेत. २१ तारखेला दोन
कुटुंब एका कार्यक्रमाला जाण्यासाठी निघाले. कार्यक्रमाच्या ठिकाणी जाण्यासाठी ते
बोटीतून प्रवास करत होते. मात्र अचानक आलेल्या पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे पाणी
बोटीत शिरले. त्यानंतर बोटीतील ६ जण पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली.
दरम्यान एनडीआरएफच्या पथकाने कालपासून शोधमोहीम सुरु केली होती.
६ जण उजनी धरणात बुडाल्याची घटना कळताच
प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली. एनडीआरएफच्या टीमने शोधमोहीम सुरु केली.
काळ दिवसभर शोधमोहीम राबवून देखील कोणाचा शोध लागला नाही. मात्र आज सकाळी
एनडीआरएफच्या टीमला ५ जणांचे मृतदेह सापडले होते. त्यानंतर काही कालावधीने ६ वा
मृतदेह देखील एनडीआरएफच्या पथकाला सापडला. तब्बल ४० तासांच्या शोधमोहिमेनंतर ६
जणांचे मृतदेह हाती लागले आहेत.