आज पहाटे दिल्लीहून वाराणसीला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटमध्ये बॉम्बची धमकी देण्यात आली, ज्यामुळे तत्काळ सुरक्षा उपाय करण्यात आले. कसून सुरक्षा तपासणीसाठी हे विमान तातडीने आयसोलेशन बेमध्ये हलवण्यात आले.तसेच प्रवाशांना सुखरूपपणे खाली उतरवण्यात आले.
परिस्थिती सुरक्षितपणे हाताळली जावी यासाठी विमान सुरक्षा आणि बॉम्ब निकामी करणारे पथक सध्या घटनास्थळी आहे.
“सर्व प्रवासी सुरक्षित आहेत आणि उड्डाणाची सविस्तर तपासणी केली जात आहे. सर्व प्रवाशांना कोणतीही घटना न होता आणीबाणीतून बाहेर काढण्यात आले” असे विमानतळाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे
विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, वॉशरूममध्ये टिश्यू पेपर सापडला होता आणि सकाळी 5.35 वाजता त्याची नोंद झाली. सध्या या प्रकरणाची पुढील चौकशी करण्यात येत आहे.
या महिन्यात म्हणजेच 1 मेपासून आतापर्यंत 28 दिवसांत विमानतळ, शाळा, रुग्णालयासह बॉम्बची धमकी देण्याची ही आठवी घटना आहे. यापूर्वी 23 मे रोजी दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजमध्ये बॉम्ब ठेवण्याची धमकी देण्यात आली होती. त्याआधी गृहमंत्रालयालाही बॉम्बची धमकी देण्यात आली होती. मात्र सर्व धमक्या खोट्या निघाल्या होत्या.