पुण्यातील हायप्रोफाईल अपघातप्रकरणात अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवाल आणि आजोबा सुरेंद्र अगरवाल यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. कोर्टाने त्यांच्या कोठडीत चार दिवसांची वाढ केली आहे. त्यामुळे विशाल अगरवाल आणि सुरेंद्र अगरवाल यांचा ३१ मे पर्यंत कोठडीत मुक्काम असणार आहे. विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने कल्याणीनगर येथे दोन जणांना उडवले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनी वेगाने कारवाई करत सर्वाना अटक केली होती. दोघांना कोर्टात हजर केल्यानंतर दोन्ही पक्षांच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आले. त्यानंतर कोर्टाने कोठडी सुनावली आहे.
पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या अपघातामुळे संपूर्ण देशभरात एकच खळबळ उडाली आहे. या अपघात प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहे. तर या प्रकरणी पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपी मुलगा, त्याचे वडील विशाल अग्रवाल आणि अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक केली आहे. तर आता या प्रकरणात आणखी एक नवीन अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. अतुल घटकांबळे या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात अतुल घटकांबळेने ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी पैसे पुरवल्याची माहिती आहे. तसेच पोलिसांनी ससूनमधील फॉरेन्सिक डॉक्टरांनाही अटक केली आहे.