बंगालमध्ये मतदानाच्या शेवटच्या टप्प्यादरम्यान उत्तर २४ परगणा येथील बशीरहाटमध्ये लाखो रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या असल्याची बातमी समोर आले आहे. .
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशिरा बशीरहाटच्या वर्नालीपारा भागातील एका बहुमजली घरावर छापा टाकण्यात आला. त्याठिकाणी २२ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या बनावट नोटा सापडल्या आहेत.
या घटनेत ‘स्पेशल ऑपरेशन ग्रुप’ (एसओजी) आणि बसीरहाट पोलीस स्टेशनने एकूण आठ जणांना अटक केली आहे. आरोपींकडून नऊ मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
प्राथमिक तपासानंतर अटक करण्यात आलेल्या आठपैकी पाच जण हे राज्याबाहेरील असल्याचे पोलिसांना समजले आहे . एक बशीरहाटमध्ये राहतो आणि दुसरा बदुरियामध्ये राहतो. बनावट नोटा छापण्याच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा हात आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. बशीरहाट लोकसभा मतदारसंघात खोट्या नोटांची तस्करी करण्यात कोणती टोळी सक्रिय आहे का, याचाही तपास सुरू आहे.