जोगेंद्रनाथ मंडल यांचा आज स्मृतिदिन (२ जानेवारी १९०४ – ५ ऑक्टोबर १९६८) हे आधुनिक पाकिस्तानच्या केंद्रीय व अग्रणी संस्थापकांपैकी एक होते, तसेच ते पाकिस्तानचे पहिले कायदा व कामगार मंत्री होते. ते बंगाल प्रांतातील अनुसूचित जातीचे (दलित) नेते होते. शेड्युल कास्ट फेडरेशन चे मोठे नेते होते. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना बंगाल प्रातांतून संविधान सभेवर निवडून देण्यात त्यांचे मोठे योगदान होते.
भारताची फाळणी च्या वेळी मंडल यांनी मुस्लिम लीग वर विश्वास ठेवला, लीग च्या नेत्यांनी त्यांना आस्वस्थ केले की स्वतंत्र पाकिस्तानात दलितांना सामान्य पेक्षा जास्त अधिकार दिले जातील. तेंव्हा त्यांनी पाकिस्तान मध्ये जाणे पसंत केले. परंतु फाळणीनंतर मात्र पाकिस्तान मध्ये हिंदूंचा नरसंहार सुरू झाला, अनन्वित अत्याचार, हिंदूंच्या मालमत्तेवर ताबा, बळजबरी धर्मांतरण सुरू झाले. जोगेंद्रनाथ मंडल हे उघड्या डोळ्याने बघत होते पण कायदा मंत्री असून सुद्धा धार्मिक कट्टरतावादी नेत्यांमुळे काही करू शकत नव्हते. त्यांना वाटले पाकिस्तानात दलितांना सन्मानाचे स्थान मिळेल, विशेष अधिकार मिळतील पण तसे तसे झाले नाही. गैरमुस्लिमांचे मानवी हक्क पायदळी तुडवले जात गेले.
दूरदृष्टी असलेले डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे इस्लाम ला उत्तम जाणून तर होतेच पण त्यांनी इस्लाम संदर्भात अतिशय कठोर चिकित्सा ही केली. या विषयी बाबासाहेब म्हणतात, “आज ज्या अनुसूचित जातींना पाकिस्तानात कैद केले जात आहे त्यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी भारतात यावे… अनुसूचित जातींसाठी, मग ते पाकिस्तान असो वा हैदराबाद असो, मुसलमानांवर किंवा मुस्लीम लीगवर विश्वास ठेवणे घातक ठरेल..”
आमिष व बळजबरी ने होत असलेल्या धर्मांतराबाबत बाबासाहेब म्हणतात, “धर्मांतराच्या संदर्भात, आपण अनुसूचित जातींनी याकडे हिंसाचाराच्या मार्गाने जबरदस्तीने आपल्यासमोर ठेवलेला शेवटचा पर्याय म्हणून पाहणे आवश्यक आहे आणि बळजबरीने व हिंसाचाराने धर्मांतरित झालेल्यांनाही, मी सांगू इच्छितो की त्यांनी स्वत:ला कायमचे हरलो असे समजू नये. मी वचन देतो की, जर त्यांना परत यायचे असेल तर त्यांचे पुन्हा स्वधर्मात स्वागत केले जाईल आणि धर्मांतरापूर्वी त्यांच्याशी जसे बंधुत्वाने वागवले जात होते तसेच स्वधर्मात परतल्यानंतर देखील वागवले जाईल.” (संदर्भ – The free Press Journal, 28th November 1947. )
असे असताना जोगेंद्रनाथ मंडल इस्लाम चे वास्तव समजू शकले नाही. अशा परिस्थितीत १९५० साली मंडल यांना कायदा व कामगार मंत्री पदाचा राजीनामा देवून भारतात पळून यावे लागले. नंतर १९६८ साली त्यांचे निधन झाले. जय भीम सोबत जय मिम म्हणणाऱ्यांनी हा इतिहास व वास्तव समजून घेणे महत्वाचे वाटते.
जय भीम जय हिंद
सागर शिंदे.
सौजन्य – विश्व संवाद केंद्र ,पुणे