कोल्हापुरात आज दुर्गा दौड मार्गावर टिपू सुलतानचे उदात्तीकरण करण्याच्या हेतूने आक्षेपार्ह वाक्य लिहिल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी वेळीच कारवाई करत ते वाक्य पुसून टाकले. कोल्हापूर पोलिसांकडून शांततेचे आवाहन करण्यात आले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी टिपू सुलतानचा उदात्तीकरण करण्याच्या हेतूने स्टेटस लावण्याने कोल्हापूरमध्ये तणाव निर्माण झाला होता. टिपू सुलतान संदर्भात वाक्य दिसून आल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. .