मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतररष्ट्रीय विमानतळ १७ ऑक्टोबरला ६ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.या सहा तासांदरम्यान मुंबई विमानतळावरून कोणतेही उड्डाण होणार नाही.
मुंबई विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्यांच्या देखभालीच्या कामासाठी मंगळवारी ११ ते ५ या वेळेत बंद केले जाईल,अशी माहिती विमानतळ ऑपरेटरने एका निवेदनात दिली आहे. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई विमानतळावरील या नियोजित तात्पुरत्या बंदचा प्राथमिक उद्देश विमानतळाच्या पायाभूत सुविधा सुधारून त्यांचा सर्वोत्तम दर्जा राखण्यासाठी आहे.या काळात आवश्यक असलेली दुरुस्ती आणि देखभाल कामे करण्यात येतील