गुरूवार दि १२ ऑक्टोबर रोजी ज्ञानदाच्या सभागृहात नारी शक्ती वंदन विधेयकावरील परिसंवाद संपन्न झाला.
माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी सुत्र संचालन व प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकात या विधेयकाच स्वागत केले व चर्चेतील पुढील वक्त्यांनी वधेयक परीणाम कारक कसे होईल त्यावर प्रकाश टाकावा अशी आशा व्यक्त केली.
इशानी जोशी यांनी इतर देशांत आरक्षण आहे आपल्या कडे उशीर च झाला. ३३टक्केआरक्षण कमीच आहे. सर्व पक्षांनी विधैयक परीणाम कारक कसे होईल ते पहावे. असे मत मांडले तर राजश्री काळे यांनी विधेयक महिलां साठी उपयुक्त असल्याचे सांगितले.
दत्तात्रेय अग्निहोत्री यांनी महिलांना सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन केले.
मला भा.ज.पा.ने आरक्षित नसलेल्या जागेवर उमेदवारी देऊन निवडून आणले. गेल्या साडेनऊ वर्षांत महिलांसाठी खूप काम केले. विधेयक पारित करण्याची इच्छाशक्ती दाखवली. आता आपण मिळून यशस्वी अंमल बजावणी करूयात असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव व माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी सांगितले.
पसायदान म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.