एकवेणी जपाकर्णपूरा
नग्ना खरास्थित।
लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलाभ्यक्तशरीरिणी।।
वामपादोल्लसल्लोहलता कंटकभूषणा
वर्धनमूर्धध्वजा कृष्णा कालरात्रिर्भययंकारी।।
दुर्गेचे सातवे रूप ‘कालरात्री’ या नावाने प्रसिद्ध आहे.
नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते.
या देवीचा रंग काळा आहे. डोक्यावरील केस विस्कटलेले आहेत.
गळ्यात विजेप्रमाणे चमकणारी माळ आहे.
तिला तीन डोळे आहेत. हे तिन्ही डोळे ब्रह्मांडासारखे गोल आहेत. ते चमकदार आहेत.
कालरात्रीच्या प्रत्येक श्वासाश्वासातून अग्नीच्या भयंकर ज्वाला निघतात.
गाढव हे कालरात्री देवीचे वाहन आहे.
डावीकडील वरच्या हातात लोखंडाचा काटा आणि खालच्या हातात खड्ग (कट्यार) आहे.
कालरात्रीचे रूप दिसायला अत्यंत भयाकारी आहे.
पण संकटाचा नाश करणारी असल्यामुळे तिचे नाव ‘शुभंकारी’ सुद्धा आहे.
मृत्यूला जिंकणारी,काळाला मारणारी,संकटाला न घाबरता सामोरे जायला प्रवृत्त करणारी,मात करायला शिकवणारी म्हणुन कालरात्रीचं स्मरण केलं जातं.
अश्विन शुध्द सप्तमीला म्हणजेच सातव्या माळेला सप्तशृंगी गडावर हिचा वास असतो असं मानलं जातं.
मात्र मृत्यूला जिंकणाऱ्या, म्हणजे कठोर झालेल्या या कालरात्रीला जाई,जुई या कोमलतेचं प्रतिक असणाऱ्या फुलांनी सजवले जातं.
संकटावर मात करण्याची शक्ती देणारी काळरात्री भक्तांसाठी निद्रादेवी स्थित आहे.म्हणुनच म्हटलं आहे__
*या देवी सर्व भूतेषु
निद्रारूपेण संस्थिता |
नम: तस्मै नम: तस्यै
नम: तस्मै नमः नम:।।*
सौ.श्रध्दा जोशी ,कोपरगाव.
सौजन्य – समिती संवाद, पश्चिम महाराष्ट्र