शिवसेनेच्या दोन्ही गटांचा परंपरेनुसार चालत आलेला दसरा मेळावा उद्या पार पडणार आहे. ठाकरे गटाचा दसरा मेळावा दादर येथील शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थवर होणार आहे. तर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आझाद मैदान इथे पार पडणार आहे.
उद्या होणाऱ्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात पोचली आहे.या मेळाव्यासाठी राज्यभरातून लोक येत असतात. काही खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. या खुर्च्यांवर शिवसेनेचे नेते उपनेते आणि पदाधिकारी बसतील. तर त्यामागे शिवसैनिकांना बसण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली आहे. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने हा दसरा मेळावा महत्वाचा आहे. या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलतात याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
निवडणूक आयोगाने मूळ शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतरचा त्यांचा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे. शिंदेंच्या दसरा मेळाव्यात दोन लाख लोक येणार असल्याचा अंदाज व्यक्त आहे. हा मेळावा शिवाजी पार्कवरील मेळाव्यापेक्षाही विशाल आणि यशस्वी व्हावा, यासाठी शिंदे गटाची जोरदार तयारी सुरू आहे.