Pahalgam Terrorist Attack: २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देश हादरला आहे. या भयानक हल्ल्यात २७ नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी आहेत. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त होत असतानाच या हल्ल्यात बचावलेल्या एका शिक्षकाने थरारक अनुभव सांगितला आहे.
प्राध्यापक भट्टाचार्य असे या शिक्षकाचे नाव असून ते आसाम विद्यापीठात बंगाली विभागात सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, ते आपल्या कुटुंबासमवेत जम्मू काश्मीरला पर्यटनासाठी गेले होते. हल्ल्यादरम्यान, एका झाडाखाली ते विश्रांती घेत होते तेव्हा अचानक गोळीबार सुरू झाला आणि त्यांना समोरच्या मैदानातून कलमा पठणाचा आवाज आला.
काय घडतेय हे व्यवस्थित कळण्याच्या आताच एक दहशतवादी त्यांच्या समोर आला. या दहशतवाद्याने त्यांच्या पाठीमागे असलेल्या एका व्यक्तीवर गोळीबार केला. त्यावेळी त्या दहशतवाद्याने त्या शिक्षकाला विचारले की, तुम्ही काय करत आहात?यावर त्या शिक्षकाला काही सुचले नाही म्हणून त्यांनी कलमा म्हणायला सुरवात केली. त्यानंतर तो दहशतवादी पुढे निघून गेला.
त्यानंतर ते शिक्षक त्यांच्या पत्नी आणि मुलाला घेऊन डोंगराच्या दिशेने चालू लागले. त्यानंतर सुमारे दोन तास ते तसेच पुढेपुढे चालत राहीले. खूप दूरपर्यंत चालल्यानंतर त्यांना एक घोडेवाला भेटला. त्या घोडेवाल्याच्या मदतीने ते पोलीस ठाण्यात गेले आणि त्यांनी घडलेली सर्व घटना सांगितली.