अल्लू अर्जुनचा आणि रश्मिका मंदानाचा ‘पुष्पा २’ हा या वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपट होता. या ॲक्शन थ्रिलर सिनेमाच्या रिलीजची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. अखेर हा सिनेमा काल ५ डिसेंबरला जगभरात रिलीज झाला आहे. ‘पुष्पा २’ने पहिल्याच दिवशी ऐतिहासीक कमाई केली आहे. या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये इतकी क्रेझ होती की आगाऊ बुकिंगमध्येच सर्व रेकॉर्ड मोडले आहे.
५ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात ‘पुष्पा २ प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित झाल्यापासून प्रत्येक चित्रपटगृहात या सिनेमाचे हाऊसफुल्लचे फलक लटकलेले दिसत आहे. बॉक्स ऑफिस रिपोर्टकडे नजर टाकल्यास या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुरुवारी सर्व भाषांसह १६५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. यातील तेलुगू चित्रपटाने सर्वाधिक ८५ कोटींचे कलेक्शन केलं आहे. या चित्रपटाने हिंदीमध्ये ६७ कोटी रुपये, तामिळमध्ये ७ कोटी रुपये, कन्नडमध्ये १ कोटी रुपये आणि मल्याळममध्ये ५ कोटी रुपयांची कमाई केली.
या चित्रपटाच्या पोस्टरपासून ते टीझर, ट्रेलर, गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाची प्री-तिकीट विक्रीही बंपर होती आणि हा ॲक्शन थ्रिलर चित्रपटगृहात दाखल होताच तो पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या लांबच लांब रांगा लागल्या.या चित्रपटाने पहिल्याच दिवशी सर्व भाषांमध्ये रेकॉर्ड तोडले आहे. बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या जवानला मागे टाकत हा पहिल्या क्रमांकाचा सिनेमा ठरला आहे. सुकुमार दिग्दर्शित ‘पुष्पा 2’ सिनेमाने रिलीजच्या आदल्या दिवसापासून म्हणजेच ४ डिसेंबरपासून रात्री उशीरा सिनेमाचे शो आयोजित केले होते. रात्री उशीरा सिनेमा पाहायला प्रेक्षकांनी चांगली गर्दी केली आणि सिनेमाला १०.१ कोटींचा फायदा झाला.
‘पुष्पा 2’ ने शाहरुख खानच्या पठाण (५७ कोटी) आणि जवान (७५ कोटी) प्रभासच्या कल्की 2898 एडी (९५ कोटी), यशच्या KGF 2 (११६ कोटी), रणबीर कपूरचा ऍनिमल (६३.८० कोटी), ज्युनियर एनटीआरला पराभूत केलं असून रामचरणच्या RRR (१६३ कोटी), बाहुबली 2 (१२१ कोटी) यासह सर्व चित्रपटांचे ओपनिंग डे कलेक्शन धुळीस मिळाले आणि यासोबतच हा चित्रपट आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. वीकेंडला चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ‘पुष्पा 2’ पुढील दिवसांमध्ये किती कमाई करतो, याची सर्वांना उत्सुकता आहे.