पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज विजय दिवसानिमित्त १९७१ च्या ऐतिहासिक विजयात सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांना श्रद्धांजली वाहिली आहे .या दिग्गज नेत्यानी आपल्या एक्स हँडल वर पोस्टच्या माध्यमातून भारत मातेच्या सुपुत्रांचे स्मरण केले आहे.
पंतप्रधान मोदींनी लिहिले आहे की, “आज विजय दिवसाच्या दिवशी, आम्ही त्या शूर सैनिकांच्या धैर्याचा आणि बलिदानाचा सन्मान करतो ज्यांनी 1971 मध्ये भारताच्या ऐतिहासिक विजयात योगदान दिले आहे . त्यांच्या निःस्वार्थ समर्पणाने आणि अटल संकल्पाने आमच्या राष्ट्राचे रक्षण केले आणि आम्हाला गौरव मिळवून दिला. हा दिवस त्यांच्या विलक्षण शौर्याला आणि त्यांच्या दृढ भावनेला समर्पित आहे. “त्यांचे बलिदान पिढ्यांना नेहमीच प्रेरणा देईल आणि आपल्या देशाच्या इतिहासाच्या पानावर कायमचे कोरले गेले आहे .”
Today, on Vijay Diwas, we honour the courage and sacrifices of the brave soldiers who contributed to India’s historic victory in 1971. Their selfless dedication and unwavering resolve safeguarded our nation and brought glory to us. This day is a tribute to their extraordinary…
— Narendra Modi (@narendramodi) December 16, 2024
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणतात की , “सर्वांना विजय दिवसाच्या शुभेच्छा.” विजय दिवस हे सैन्यातील शूर सैनिकांच्या धैर्याचे, अतूट समर्पणाचे आणि शौर्याचे प्रतीक आहे. १९७१ साली या दिवशी लष्कराच्या शूर जवानांनी शत्रूंचे धैर्य भेदून तिरंगा अभिमानाने फडकवलाच, पण मानवी मूल्यांचे रक्षण करून जगाच्या नकाशावर ऐतिहासिक बदल घडवून आणला. आपल्या शूरवीरांच्या शौर्याचा देशाला अनंतकाळपर्यंत अभिमान राहील.”
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, ‘आज विजय दिवसाच्या विशेष प्रसंगी, देश भारतीय सैन्य दलाच्या शौर्याला आणि बलिदानाला सलाम करतो. त्यांच्या अतुलनीय धैर्याने आणि देशभक्तीने आपला देश सुरक्षित राहिला. त्यांचे त्याग आणि सेवा भारत कधीही विसरणार नाही.
Today, on the special occasion of Vijay Diwas, the nation salutes the bravery and sacrifice of India’s armed forces. Their unwavering courage and patriotism ensured that our country remained safe. India will never forget their sacrifice and service.
— Rajnath Singh (@rajnathsingh) December 16, 2024
विजय दिवसाचे महत्त्व
पाकिस्तानवर भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 डिसेंबर रोजी विजय दिवस साजरा केला जातो.1971 च्या युद्धाचा इतिहास
1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 3 डिसेंबरला युद्ध सुरू झाले आणि ते 13 दिवस चालले. तत्कालीन पूर्व पाकिस्तानात (आजचा बांगलादेश) होत असलेल्या मानवतावादी संकटामुळे हे युद्ध झाले. पाकिस्तानी लष्कराने तेथील सामान्य लोकांवर निर्दयी मोहीम सुरू केली होती. 16 डिसेंबर 1971 रोजी, पाकिस्तानी लष्कराचे कमांडर जनरल अमीर अब्दुल्ला खान नियाझी यांनी भारतीय लष्कर आणि बांगलादेशच्या मुक्ती वाहिनीच्या संयुक्त सैन्यासमोर औपचारिकपणे आत्मसमर्पण केले. 1971 च्या मुक्तिसंग्रामात पाकिस्तानने केवळ 13 दिवसांच्या लढाईत पराभव स्वीकारला आणि ढाका येथे आत्मसमर्पण करारावर स्वाक्षरी केली. या विजयानंतर पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि बांगलादेश म्हणून अस्तित्वात आला.
एवढेच नाही तर त्यांच्यासोबत सुमारे ९३ हजार पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पण केले. दुसऱ्या महायुद्धानंतरचा हा सर्वात मोठा लष्करी पराभव मानला जातो. त्यामुळे ‘विजय दिवसाचे स्मरण करताना प्रत्येक भारतीयाला आपल्या सैन्याच्या शौर्याचा अभिमान वाटला पाहिजे. हा दिवस आपल्याला देशाच्या संरक्षणासाठी आणि विकासासाठी एकजुटीने काम करण्याची प्रेरणा देतो.