Delhi Election Result : नुकतीच दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले आहे. उद्या या निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. याआधीच दिल्लीत राजकीय नाट्य सुरू झाले आहे. एसीबीचे पथक आपचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि आप नेते संजय सिंह यांच्या निवासस्थानी पाठवण्यात आले आहेत.
दिल्ली उपराज्यपालांच्या प्रधान सचिवांनी मुख्य सचिवांना पत्र लिहून आप आमदारांना लाच दिल्याच्या आरोपांची एसीबी चौकशी करण्याची मागणी केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे एसीबी पथक आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचले.
खरं तर दोन दिवसांपूर्वी आप पक्षातील काही नेत्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले होते. भाजपने आमच्या 7 उमेदवारांना 15-15 कोटी रुपयांची ऑफर दिली असल्याचं त्यांनी म्हंटल होत. याच प्रकरणावरून दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी या आरोपांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याच चौकशी प्रकरणात एसीबी पथक आता अरविंद केजरीवाल आणि आप नेते संजय सिंह यांच्या निवास्थानी पोहचले आहेत.
दिल्लीत 5 फेब्रुवारी रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर 6 फेब्रुवारी रोजी आप नेते आणि खासदार संजय सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन आपच्या सात नेत्यांना 15-15 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप भाजपवर केला होता.