महाराष्ट्रात किती मतदार आणि कुठे – कुठे वाढले ? हे ऑलरेडी निवडणूक आयोगाने सांगितलेलच आहे. दिल्लीमध्ये मोठा पराभव होणार असल्याने ते कव्हर फायरिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना माहित आहे की दिल्लीत त्यांचा सुपडासाफ होणार आहे आणि म्हणूनच राहुल गांधीनी ही तयारी सुरु केली आहे. मी वारंवार सांगतो. जोपर्यंत गांधी आत्मचिंतन करणार नाहीत आणि कायम आपल्या मनाची समजूत काढून घेत राहतील, तोपर्यंत जनतेचं समर्थन त्यांना कधीच मिळणार नाहीत. त्यांचा पक्ष देखील पुन्हा तग धरु शकणार नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते आज दुपारी माध्यमांशी बोलत होते.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत. महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेशातील गेल्या विधानसभा निवडणुकीतील वाढीव मतदारांची यादी सादर केली. महाराष्ट्रात २०१९ च्या विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान २०२४ मध्ये तब्बल ३२ लाख मतदार वाढवले गेले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आणि विधानसभा निवडणुकांमधील पाच महिन्यांच्या कालावधीत ३९ लाख मतदार जोडले गेले. तर हे ३९ लाख मतदार कोण आहेत? ते हिमाचल प्रदेशच्या एकूण मतदारांच्या संख्येइतके आहेत. सरकारच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ९.५४ कोटी आहे. पण निवडणूक आयोगानुसार महाराष्ट्रात त्याहून जास्त मतदार आहेत. लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या जास्त आहे, असा दावा राहुल गांधींनी केला होता. तसेच पुढे त्यांनी अचानक हे मतदार कसे वाढले ? असा प्रश्न उपस्थित करत निवडणुकीत पारदर्शकता ठेवण्याची जबाबदारी आमची नसून तुमची आहे असत म्हणत, निवडणूक आयोगाकडे याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली होती. सोबतच आम्ही निवडणूक आयोगावर आरोप करत नसून आयोगाने लोकसभा आणि विधानसभेची मतदार यादी ही नाव, पत्ता आणि फोटोग्राफसह उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती देखील केली होती. गांधी यांच्या या पत्रकार परिषदेनंतर ते विरोधकांच्या चांगल्याच रडारवर आले आहेत.
राहुल गांधींच्या या विधानानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अगदी मोजक्या शब्दात चांगलच प्रत्युत्तर देत गांधींना सुनावलं आहे.